ओटावा, (कॅनडा) – गाझामध्ये कॅनडा आणि स्वीडनने पुन्हा मदत करायला सुरुवात केली आहे. गाझामध्ये मदत वितरीत करणार् या युनायटेड नेशन्स रिलीफ ऍन्ड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन एजन्सीच्या कर्मचार् यांकडून हमासला मदत केली जात असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभुमीवर अनेक देशांनी या एजन्सीला मदत देणे थांबवले होते.
मात्र आता ही मदत पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे कॅनडाचे आंतरराष्ट्रीय विकासासाठीचे मंत्री अहमद हुसेन यांनी सांगितले. पॅलेस्टाईन नागरिकांना तातडीने मदतीची गरज असल्याने ही मदत पुन्हा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कॅनडाप्रमाणे स्वीडननेही या एजन्सीला पुन्हा मदत सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तातडीची मदत म्हणून २० दशलक्ष डॉलरची मदत स्वीडनने पाठवून दिली आहे.
या एजन्सीकडून हमासला मदत झाल्याचे ठोस पुरावे इस्रायलने दिलेले नाहीत. हमासला मदत केल्याचा आरोप असलेल्या कर्मचार् यांना या एजन्सीने तात्काळ कामावरून कमी केले आहे.
तसेच त्यांच्याविरोधातल्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सरचिटणीस ऍन्टनिओ गुटरेस यांनीही स्वतंत्रपणे तपास समिती नियुक्त केली आहे.