मेष : चांगली बातमी कळेल
वेळेचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. व्यवसायात महत्त्वाच्या कामात स्वतः जातीने लक्ष द्याल. ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. पैशांची आवक समाधानकारक राहील. विनाकारण होणारा विलंब व गैरसोय तुमची चिडचिड वाढवेल. नोकरीत आळस केलात तर त्याचा त्रास नंतर होईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.
वृषभ : परिस्थितीशी मिळतेजुळते घ्या
माणसांची पारख करण्यात यश आले तर बरेच काही मिळवू शकाल. सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने कोड्यात पडाल. व्यवसायातील कामांना कुठून व कशी सुरुवात करावी, असा संभ्रम राहील. त्यामुळे थोडा विलंब सहन करावा लागेल. परिस्थितीशी मिळतेजुळते घेतल्यास त्रास होणार नाही. कामात चोख रहा. घरातील व्यक्तींच्या जीवनातील शुभघटनेची नांदी होईल.
मिथुन : ग्रहांची साथ
ग्रहांची साथ मिळेल. गतिमान बनून महत्त्वाच्या कामात कृती केलीत तर त्याचा उपयोग सर्वांगाने तुम्हालाच होईल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी आधुनिक तंत्र अमलात आणाल. नोकरीत महत्त्वाच्या कामात तुमचा सहभाग राहील. तुमच्या कामामुळे वरिष्ठ व सहकाऱ्यांमध्ये स्वतःची छाप पाडाल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद वाटेल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
कर्क : रवि, शुक्र अनुकूल
रवि, शुक्र अनुकूल आहेत त्यामुळे कामाची विस्कटलेली घडी नीट व्हायला मदत होईल. व्यवसायात पैशांच्या व्यवहारांना महत्त्व दिलेत तर बरीचशी कामे मार्गी लागतील. नेहमीच्या कामापेक्षा वेगळ्या कामात लक्ष घालण्याचा आनंद मिळेल. अडकून पडलेले पैसे मिळतील. नोकरीत विरोधकांचा बिमोड करू शकाल. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतील.
सिंह : विशेष लाभ
अडथळ्यांची शर्यत पार करून कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात पूर्वी केलेल्या तडजोडीचा चांगला परिणाम दिसून येईल. पैशांची बाजू सुधारेल. तुमच्यातील चैतन्य जागृत होईल. नोकरीत कामानिमित्ताने एखादी सुविधा मिळेल. प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील.
कन्या : कामे मार्गी लागतील
योग्य वातावरण लाभेल. कामात आलेला विस्कळीतपणा पूर्वस्थितीवर आणू शकाल. व्यवसायातील कामात व्याप वाढेल. कामात सुधारणा दिसू लागेल. तत्त्वांशी तडजोड व हितचिंतकांची मदत यांमुळे कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन कामाची पद्धत व वातावरणातील बदल यांमुळे अस्वस्थता येईल. तरुणांना दिलासा मिळेल.
तूळ : संधीचा फायदा घ्या
ठरवलेली कामे पूर्ण करण्याचा चंग बांधाल. वेळ व पैशांचे गणित आखून त्याप्रमाणे कृती कराल. व्यवसायात प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करा. मिळालेल्या संधीचा योग्य तो फायदा घ्या. योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत घेऊन काम पूर्ण करा. विलंब झालेली कामे मार्गी लावू शकाल. घरात चांगल्या कारणासाठी मोठे खर्च होतील. महिलांना सुसंधी मिळेल.
वृश्चिक : पैशांची चिंता मिटेल
केलेल्या कष्टाचे चीज होईल, त्यामुळे समाधानाचा आनंद मिळेल. तुमच्या प्रगतीच्या रथाला गती येईल व परिस्थिती झपाट्याने बदलेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. लांबलेली कामे मार्गी लागतील. कामाचा विस्तार करण्याचा विचार मनात येईल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या कामाविषयी वरिष्ठांना खात्री वाटेल. आप्तेष्टांच्या भेटीगाठीने आनंद वाढेल.
धनू : अनपेक्षित सुखद दिलासा
ताण-तणाव कमी झाल्याने निःश्वास टाकू शकाल. अनपेक्षित सुखद दिलासा मिळेल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींकडून कडू-गोड अनुभव येतील; त्यातूून बरेच काही शिकाल. कामात चोख राहून कामे वेळेत पूर्ण करा. नवीन कामे मिळतील. नोकरीत चांगल्या कामासाठी तुमची निवड होईल. घरात कौटुंबिक प्रश्न कमी होतील. तुमच्या सल्ल्याला मान मिळेल.
मकर : चुणूक दाखवण्याची संधी
मंगळ अनुकूल असल्याने मनोबल उत्तम राहील. आशावादी दृष्टिकोन ठेवून प्रगती कराल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन पूर्ण कराल. खर्च व जमा यांचे प्रमाण समसमान राहील. तुमचा आत्मविश्वास बळावेल व त्या जोरावर अशक्यप्राय कामे हाती घेऊन पूर्ण कराल. नोकरीत कामाचे समाधान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. महिलांना अंगी असलेली चुणूक दाखवण्याची संधी.
कुंभ : स्पर्धेत उतरा
सभोवतालच्या व्यक्तींशी तुम्ही जुळवून घेण्यात यशस्वी झालात तर तुमचा कार्यभाग साधेल. व्यवसायात स्पर्धेला तोंड देण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक ठरेल. जाहिरात व प्रसिद्धीमाध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. खेळत्या भांडवलाची गरज भासेल. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः हाताळा. कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. कामाचा ताण थोडासा कमी होईल.
मीन : आशेचा किरण दिसेल
योग्य दिशा मिळाल्याने कामात गती येईल. व्यवसायात योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. आशेचा किरण दिसेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामेही मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवलेत, तर पैशांची चणचण भासणार नाही. नोकरीत आपले काम बरे, की आपण बरे हे धोरण ठेवा. सहकाऱ्यांची मदत मिळेल, ही अपेक्षा नको. अनावश्यक खर्च टाळावेत. अतिआत्मविश्वास बाळगू नये. महिलांनी कृतीवर जास्त भर द्यावा