अकोले -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा तालुक्याच्या दृष्टीने मोठी उपलब्धी ठरणार आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अथक परिश्रमातून व शेतकऱ्यांच्या योगदानातून निर्माण झालेल्या व उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या विविध प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान यांचा ऐतिहासिक दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करण्याचे आवाहन माजी आ. वैभवराव पिचड यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौरा नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, शिवाजी धुमाळ, गिरजाजी जाधव, बाळासाहेब वडजे, रावसाहेब वाकचौरे, सुनील दातीर, सुधाकर देशमुख, सुरेश खांडगे, राहुल देशमुख, सोमनाथ मेंगाळ, सीताराम देशमुख, भाऊ खरात, सोमदास पवार, रमेश राक्षे आदी उपस्थित होते
पिचड म्हणाले की, कार्यक्रमात राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो किसान सन्मान योजनेचा प्रारंभही मोदींया हस्ते करण्यात येणार असून, शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन होणार असून निळवंडे धरणाचे लोकार्पण होणार आहे. तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी, कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सकाळी 10पर्यंत शिर्डी येथील कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन केले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नायकवाडी यांनी अनुसूचित जनजाती मोर्चाची माहिती दिली. या वेळी लंघे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक यशवंत आभाळे यांनी, तर सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
पिचडांचा होणार मोदींच्या हस्ते सन्मान
निळवंडे धरण पूर्ण करणे व आदर्श पुनर्वसन करणारे माजी मंत्री मधुकरराव पिचड व धरणात जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त यांचा सन्मान या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते होणार आहे