मेष : चित्त स्थिर नसल्याने “”तळ्यात मळ्यात”होईल. व्यवसायात योग्य व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्या. कर्तव्यपूर्तीला प्राधान्य द्या. नोकरीत वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची कामात मोलाची मदत मिळेल. मिळालेल्या संधीचे सोने करा. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवा. महिलांनी पैशाचे व्यवहार करताना जपून करावेत. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : काहीतरी भव्यदिव्य करण्याची सुप्त इच्छा राहील. परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जा. व्यवसायात धोरणी राहून कामे संपवा. नोकरीत नवीन अनुभवासाठी कामाचा ताण वाढला तरी चिडचिड करू नका. अधिकाराचे पद मिळेल. महिलांनी हातून चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तडजोडीचे धोरण ठेवून इतरांशी वागावे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन : “हाती घ्याल ते तडीस न्याल.” व्यवसायात प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशाची आवक वाढेल. आखलेले आखाडे बरोबर येतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडधंद्यातून विशेष फायदा. नवीन कामाची संधी मिळेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. कलाकार खेळाडूंना मान मिळेल.
कर्क : काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागते याची प्रचिती येईल. व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी. कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्यक ठरेल. नोकरीत प्रलोभनांपासून दूर राहणे फायद्याचे होईल. कामानिमित्ताने प्रवास, महिलांना मनाची एकाग्रता साधता येईल. आत्मविश्वास वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. महिलांनी बाऊ न करता कामे करावीत.
सिंह : व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. वरिष्ठांच्या मर्जीत राहून फायदा. महिलांना आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. घरात मनाप्रमाणे कामे होतील. शुभवार्ता कळेल.
कन्या : देवाची साथं. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवा. अनपेक्षित पत्रव्यवहार होतील. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीच असेल. आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. कामामुळे इतरांची मने जिंकून घ्याल.
तुळ : अचानक सर्व काही सुरळीत झाल्याने आनंद मिळेल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. घेतलेले निर्णय योग्य ठरतील. हातून चांगली कामे गती घेतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाधान मिळेल. महिलांना परोपकाराची संधी मिळेल. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील.
वृश्चिक : नोकरी व्यवसायात मनातील इच्छा सफल होतील. महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी. कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्वासाने केलेली कृती- कौतुकास पात्र ठरेल. महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्न मार्गी लावतील. राजकारणी व कलाकार खेळाडंना प्रसिद्धी.
धनु : व्यवसायात मेहनत व चिकाटीने अशक्यप्राय कामे शक्य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. कमी श्रमात जास्त यश. नोकरीत कार्यक्षमता वाढवून कामे करा. बेफिकीर राहून चालणार नाही. महिलांना तात्विक वादविवादांना सामोरे जावे लागेल तरी डोके शांत ठेवा. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या.
मकर : आळस झाडून मोठ्या उमेदीने कामाला लागा. व्यवसायात सुसंवाद साधून कामे करण्यावर जास्त भर द्या. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करा. स्वत:चे काम संपवून इतरांना कामात मदत करा. महिलांचा मानसिक ताण कमी होईल. सुवार्ता कळेल. महत्त्वाचे प्रश्न धसास लागतील. लेखक, कलावंतांना प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : तुमच्या वागण्या बोलण्याने तुम्ही इतरांची मने जिंकून घ्याल. नम्र व संयमाने वागून कामे पूर्ण करा. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. महिलांना जुनी येणी वसुल झाल्याने पैशाची ऊब मिळेल. खर्च वाढला तरी तो चांगल्या कारणासाठी होईल. मन:स्वास्थ्य मिळेल.
मीन : “रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती होईल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत नवीन गोष्टी शिकण्याची संधी. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. महिलांना वेळेचा छान उपयोग करून घेता येईल. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. उत्साही रहाल.