मेष : प्रगती साधाल
अडी-अडचणी, अडथळे यांवर मात करून प्रगती साधाल. जिद्द व आत्मविश्वास यांच्या जोरावर यश मिळवाल. व्यवसायात कामांना गती द्याल. रेंगाळलेली कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याचा चंग बांधाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची साथ मिळेल. जादा कामाची तयारी असेल तर अर्थप्राप्ती चांगली होईल.
वृषभ : यश मिळेल
कर्तृत्वाला यशाची झालर मिळेल, त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दगदग, धावपळ वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत महिलांना त्यांचे कार्यक्षेत्र व घर या दोन्हींकडे लक्ष देणे जड जाईल. वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करून त्यात यशस्वी होतील. पैशांचा उपयोग योग्य कारणासाठीच व्हावा, असा अट्टाहास असेल.
मिथुन : अनुकूल वातावरण
नशीब व प्रयत्न यांची सांगड योग्य प्रकारे घालून यश संपादन कराल. त्याला पूरक वातावरणाचीही साथ मिळेल. व्यवसायात अशक्यप्राय कामात यश मिळेल. तुमची कामाची उमेद दांडगी राहील. नवीन कामे सतर्क ठेवतील. नोकरीत आवश्यक असलेल्या गुणांची कदर वरिष्ठांकडून होईल. सामूहिक क्षेत्रात मोठी मजल माराल. अनुकूल वातावरणाचा योग्य उपयोग करावा.
कर्क : सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
कामात चोखंदळ राहून कामे योग्य पद्धतीने हातावेगळी करा. व्यवसायात मनोधैर्य उत्तम राखले तर बाजी माराल. सकारात्मक दृष्टिकोन उपयोगी पडेल. भरपूर काम करूनही म्हणावे तसे पैसे न मिळाल्याने निराश व्हाल. पैशांची चणचण भासेल. नोकरीत कुसंगत धरून वाकडे पाऊल टाकू नका. कामात गुप्तता राखा. मिळालेल्या संधीचे सोने करा. वरिष्ठांचा सल्ला घ्या.
सिंह :कार्यतत्पर राहा
तुमच्या मनाला पटेल, रुचेल त्याप्रमाणेच वागा. केलेल्या कृतीचे समर्थन करा. व्यवसायात पैशांसाठी कोणतेही कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. मात्र, कुसंगत टाळा. सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा मूड पाहून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. कार्यतत्पर राहून कामे करा. घरात पेल्यातील वादळे उठतील व पेल्यातच शमतील.
कन्या : संयम राखा
कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नये. व्यवसायात आवक-जावक समसमान राहील. खर्चाचे गणित कोलमडले तरी महत्त्वाच्या खर्चांना प्राधान्य द्या. पैशांची तात्पुरती सोय होईल. नोकरीत हातून चुका होणार नाहीत, याची काळजी घ्या. अतिआत्मविश्वास टाळा. कामातील बेत गुप्त ठेवा. घरात इतर व्यक्तींच्या गरजा भागवूनही त्यांचे समाधान होईलच, असे नाही.
तूळ : व्यवहारी राहा
“अंथरूण पाहून पाय पसरा.’ व्यवसायात यश मिळालेच पाहिजे, हा अट्टाहास धरू नका. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कृती करा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. नोकरीत स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. पैशांचा अपव्यय टाळावा. घरात स्वतःचा हट्टी स्वभाव नडेल.
वृश्चिक :समतोल राखा
“रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती तुमची असेल. घर व व्यवसाय दोन्हींकडे लक्ष द्यावे लागेल. कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन ध्येय-धोरणे स्वीकाराल. कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कृती कराल. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करा. गोंधळून न जाता शांतचित्ताने विचार करा.
धनू : अतिविश्वास टाळा
दिलेला शब्द पाळा. कृती आणि विचार यात समतोलपणा राखा. व्यवसायात सभोवतालच्या परिस्थितीशी मिळते-जुळते घ्यावे लागेल. कामात लवचिकता आणून निर्णय घ्यावे लागतील. अतिविश्वास टाळा. पैशांच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेऊ नका; नुकसान तुमचेच होईल. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. “आपले काम बरे की आपण बरे’ धोरण उपयोगी पडेल.
मकर : “जिभेवर साखर ठेवा’
योग्य वेळी योग्य व्यक्तींचा उपयोग करून घेऊन कामे मार्गी लावण्यात तुमचा हातखंडा असतो. परंतु या सप्ताहात माणसांची पारख करण्यात तुमची चूक होण्याची शक्यता. व्यवसायात जादा आत्मविश्वास ठेवू नये. पैशांच्या मोहमयी पाशापासून दूरच राहावे. जुनी येणी वसुलीकडे लक्ष द्यावे. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करा. “जिभेवर साखर ठेवून’ इतरांकडून खुबीने कामे करून घ्या.
कुंभ : नवे उपक्रम हाती घ्याल
जीवनपद्धती आहे तशीच टिकवण्यासाठी थोडी जास्त धावपळ, दगदग करावी लागेल. पैसे मिळवण्यासाठी दुप्पट कामे करणे गरजेचे होईल. व्यवसायात नवीन योजना उपक्रम हाती घेऊन त्याप्रमाणे कृती करावी. मात्र, त्यातील अटी नियमांचा आधीच विचार करून ठेवा. नोकरीत सहज वाटणाऱ्या कामात विलंब होण्याची शक्यता. कामानिमित्ताने लांब पल्ल्याच्या प्रवासाचे योग. नवीन ओळखी होतील.
मीन : “अति सर्वत्र वर्ज्य’
“अति सर्वत्र वर्ज्य’ असा अनुभव येईल. व्यवसायात हातातील कामे आधी संपवा; मगच नवीन कामांकडे वळा. अडथळ्यांची शर्यत पार करून यश मिळेल. पैशांची स्थिती चांगली राहील. नोकरीत मौनव्रत बाळगा. हितशत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवा. जोडधंद्यातून विशेष लाभ व्हावा. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे उरका. घरात अनावश्यक खर्च होतील. इतर व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा मनःस्ताप होईल.