नवी दिल्ली – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रन फॉर युनिटीला फ्लॅग ऑफ केला.
Delhi: Union Home Minister Amit Shah flags off ‘Run For Unity’ at National Stadium, on the occasion of Rashtriya Ekta Diwas. pic.twitter.com/SpjcE7HJYv
— ANI (@ANI) October 31, 2019
तर महाराष्ट्रात मुंबईतील नरिमन पॉईंट येथेही एकता दौडचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली.
Gujarat: Prime Minister Narendra Modi pays tribute to #SardarVallabhbhaiPatel at Statue of Unity in Kevadia. #RashtriyaEktaDivas pic.twitter.com/nMkJdrUB5c
— ANI (@ANI) October 31, 2019