वाहन नोंदणीबाबतचे कामकाज सुरू होणार
पुणे – लॉकडाऊनमुळे सुमारे दीड महिन्यांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार सोमवारपासून (दि.18) कार्यालयातील वाहन नोंदणीबाबतचे कामकाज अंशतः सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
शासनाला अधिक महसूल मिळवून देणारे आरटीओ कार्यालय लॉकडाऊनमुळे बंद होते. या कालावधीत कार्यालयातून केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परवानगी देण्याचे काम सुरू होते. मागील महिनाभरामध्ये सुमारे 11 हजार जणांना कार्यालयाकडून पासेस देण्यात आले.
सोमवारपासून वाहन नोंदणी संदर्भातील कामकाज सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय नोंदणी झालेल्या वाहनांना नंबर देणे आदी संदर्भातील विभागांचे काम सुरू होणार आहे.