अबब! एका सिनेमासाठी 24 कोटी रुपये मानधन

कंगणा राणावत झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सिनेमातून चांगलीच फॉर्मात आली आहे. आता तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्येही ती लीड रोल साकारणार आहे. तमिळमध्ये “थलाइवी’ आणि हिंदीमध्ये “जया’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. जेंव्हापासून तिने आपल्या मानधनाचा आकडा जाहीर केला आहे, तेंव्हापासून तिच्याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. आतापर्यंत गप्प बसलेल्या पब्लिकला बोलण्यासाठी निमित्तच मिळाले. कंगणावर वेगवेगळ्या कारणांनी जळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामध्ये दिव्या दत्ता आणि रणवीर शौरे यांचीही आता भर पडली आहे. या दोघांना जेंव्हा कंगणाच्या मानधनाच्या रकमेबाबत समजले तेंव्हा दिव्या दत्ताला हसायलाच आले. तिने कसे तरी करून आपले हसू दाबण्याचा प्रयत्न केला आणि गंभीर मुद्रा करण्याचा प्रयत्न केला. पण तिला हसणे रोखता आले नाही.

दुसरीकडे रणवीर शौरेला प्रतिक्रिया विचारली असता तो तर पार उखडलाच. “तुम्ही लोक “मणिकर्णिका’ आणि जयललितांच्या बायोपिकवर आम्हाला प्रतिक्रिया विचारता. आमचा आणि या सिनेमांचा काहीही संबंध नाही. आमच्या सिनेमाबद्दल काही विचारणार असलात. तर बोलतो.’ असे तो ताडकन म्हणाला. पण त्याला राग, द्वेष, मत्सर आणि थोडा पुरुषी अहंकार जाणवला असणार हे नक्‍की. कंगणाला मिळणाऱ्या एवढ्या प्रचंड मानधनाबाबत बॉलीवूडमध्ये कोणीच उघडपणे बोलायला तयार नाही. कंगणाने मिळवलेले यश लोकांना खोटे वाटते आहे किंवा तिच्यासारख्या नटीला एवढे मानधन देणेच चुकीचे वाटत असावे. म्हणूनच एवढ्या मानधनाची चेष्टा केली जाते आहे.

मात्र कंगणाने या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिने एवढ्या मानधनाचे समर्थनही केले नाही आणि आक्षेप घेणाऱ्यांचा समाचारही घेतलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.