हैदराबाद : ऑस्कर विजेत्या ‘आरआरआर’ चित्रपटाने जगप्रसिद्ध झालेला साऊथचा सुपरस्टार राम चरण सध्या आपल्या कुटुंबासाठी वेळ देत आहे. राम चरण वडील होणार असून पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला यांना पूर्ण वेळ देत आहे.
View this post on Instagram
दुबईमध्ये बेबी शॉवरचा आनंद घेतल्यानंतर हे जोडपे नुकतेच मालदीवच्या सुट्टीसाठी रवाना झाले होते आणि आता हे जोडपे हैदराबाद येथील त्यांच्या घरी परतले आहे. राम चरण पत्नी उपासनासोबत विमानतळाच्या लॉबीतून बाहेर येताच, राम चरणचा पाळीव कुत्रा रैमी ज्याने सर्वात जास्त आकर्षित केले, त्याने विमानतळावर राम चरणला पाहून त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला खूप प्रेम दिले. यानंतर राम चरणनेही आपल्या लाडक्या कुत्र्याला आपल्या मांडीत भरून खूप लाड केले.
यादरम्यान राम चरणने फिकट क्रीम रंगाचा फ्रीस्टाइल आउटफिट घातला होता, आणि उपासनाने पिवळ्या रंगाचा वनपीस ड्रेस घातला होता. राम चरणला त्याच्या संपूर्ण सुरक्षा दलात विमानतळावर आल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला आणि आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत सेल्फी काढला. दरम्यान, लग्नाच्या 11 वर्षानंतर राम चरण त्यांच्या पहिल्या मुलाचा पिता होणार आहे.