मुंबई – दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआरमध्ये खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता रे स्टीव्हनसन यांचे निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. वृत्तानुसार, रे यांच्या पीआर एजन्सी इंडिपेंडंट टॅलेंटने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनी याबाबत कोणताही तपशील शेअर केलेला नाही.
रे स्टीव्हन्सनने RRR या जागतिक हिट चित्रपटात खलनायक स्कॉट बक्सटनची भूमिका साकारली होती. रे स्टीव्हन्सनने आपली भूमिका जबरदस्त वठवली आणि जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली.
RRR व्यतिरिक्त त्याने मार्वलच्या ‘थॉर’ चित्रपटात काम केले. अलीकडेच रे स्टीव्हन्सन ‘१२४२: गेटवे टू द वेस्ट’ या ऐतिहासिक नाटकात दिसला होता. लवकरच तो डिस्ने प्लस हॉटस्टारच्या अहसोका या मालिकेचा भाग बनणार होता.
चित्रपटाचा प्रवास कसा सुरू झाला?
अभिनेता रे स्टीव्हनसन यांचा जन्म 25 मे 1964 रोजी लिस्बर्न, उत्तर आयर्लंड येथे झाला. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यानंतर तो युरोपियन टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसायचा. 1998 मध्ये आलेल्या ‘द थिअरी ऑफ फ्लाइट’ या चित्रपटात त्यांचा पहिला मोठा ब्रेक होता. त्यानंतर तो ‘किंग आर्थर’ (2004), ‘पनीशर: वॉर झोन’ (2008), ‘द बुक ऑफ एली’ (2010) आणि ‘द अदर गाय’ (2010) यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला.