Pushpa 2 | साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2’ या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्याभागातही अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. आता चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्रीचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे.
Wooohoooooo
Here is Srivalli’s 1st lookNow the excitement to watch this film has increased further.
Teri Jhalak Asharfi @iamRashmika 🔥❤️#RashmikaMandanna ❤️pic.twitter.com/EsZEfMcXkS
— Rashmika Delhi Fans (@Rashmikadelhifc) March 19, 2024
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पुष्पा 2 मधील श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना हिच्या लूकची पहिली झलक दिसली आहे. व्हिडिओमध्ये रश्मिकाने तिची सिग्नेचर लाल साडी घातली आहे. तसेच केसात गजरा घातला जातो. या लूकने चाहत्यांना पुन्हा एकदा रश्मिकाचे वेड लावले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला चारही बाजूंनी सुरक्षेने घेरले आहे आणि ती शूटिंगसाठी सेटवर जात आहे.
रश्मिकाचा हा व्हिडिओ तिच्या एका फॅन पेजने शेअर केला आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,’हा श्रीवल्लीचा फर्स्ट लूक आहे. आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
पुष्पा: द राइज मधील श्रीवल्लीची रश्मिकाची भूमिका खूप आवडली होती. या चित्रपटानंतर रश्मिकाची लोकप्रियता वाढली. चित्रपटातील रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांची केमिस्ट्रीही पाहण्यासारखी होती. आता याच्या दुसऱ्या भागातही ही अभिनेत्री दिसणार आहे. एका मुलाखतीत रश्मिकाने या चित्रपटाविषयी सांगितले होते की हा चित्रपट ‘पुष्पा द राइज’ पेक्षा मोठा असणार आहे.
दरम्यान अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा 2’ या वर्षी 15 ऑगस्ट रोजी अनेक भाषांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.