Ram Charan New Film| दाक्षिणात्य अभिनेता राम चरण सध्या प्रसिध्द्धीच्या झोतात आहे. त्याच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. देशभरात त्याचे लाखो चाहते आहेत. चाहते देखील त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतेच होळीनिमित्त सोमवारी राम चरणने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
राम चरणने काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरसोबत त्याचा आगामी चित्रपट आरसी 16 चे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याचदरम्यान अभिनेत्याने त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. राम चरण सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार यांच्यासोबत काम करणार आहे. सुकुमार यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ दिग्दर्शित केला आहे. ते सध्या अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2’ चे शूटिंग करत आहे. आता राम चरण देखील सुकुमारसोबत काम करणार आहे.
View this post on Instagram
राम चरणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर होळीच्या शुभेच्छा देताना आगामी चित्रपट आरसी 17 ची घोषणा केली. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये राम आणि सुकुमार यांच्या चेहऱ्याला रंग लागलेला दिसला. दुसऱ्या छायाचित्रात आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. राम चरणने या फोटोला एक कॅप्शनही दिले आहे, “RC 17. फोर्सेस पुन्हा एकत्र आलेत, असं कॅप्शन रामने दिले आहे.
मैत्री मूव्ही मेकर्स प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. राम चरण आणि सुकुमार यांनी याआधी 2018 मधील सुपरहिट चित्रपट ‘रंगस्थलम’मध्ये एकत्र काम केले होते. RC 17 व्यतिरिक्त राम चरण कियारा अडवाणीसोबत ‘गेम चेंजर’ या चित्रपटातही दिसणार आहे.
हेही वाचा:
”श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील नेत्यांचा दिला ‘नकार’ आता…”