ईव्हीएमवर शाई फेकून आरपीआय कार्यकर्त्याचा ईव्हीएमला विरोध

ठाणे: आज राज्यात २८८ जागांवर मतदान पार पडले. दरम्यान, रिपब्लिकन कार्यकर्ते सुनिल खांबे यांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर आले असता निवडणूक कर्मचाऱ्यांकडील शाई बॉटल हिसकावत ईव्हीएमवर फेकली. तसेच ईव्हीएम मशीन बंद करा, अशा घोषणा दिल्या. या प्रकारामुळे बूथवर एकच गोंधळ उडाला.

या सदर प्रकरणानंतर सुनिल खांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनिल खांबे म्हणाले,  ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली असून सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवलं आहे. मला फासावर लटकवलं तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)