कुरकुंभ गाव स्फोटाने पुन्हा हादरले

हायड्रोक्‍लोरिक लिक्विडची फायबरची टाकी फुटली ः सुदैवाने जीवितहानी नाही

कुरकुंभ- कुरकुंभ(ता.दौंड) औद्योगिक वसाहतील इटरनीस फाईन केमिकल कंपनी मध्ये रविवार (दि.20) रोजी रात्री साडे आठ च्या सुमारास हायड्रोक्‍लोरिक लिक्विडची फायबरची टाकी फुटून स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटाचे कारण अद्याप ही समजू शकले नसले तरी स्फोटाच्या आवाजाने कुरकुंभ परिसरात भीतीचे वातावरण आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे या औद्योगिक वसाहतीने जगाच्या नकाशावर ठळकपणे लक्ष वेधले आहे. गेल्या वीस वर्षांत येथील कंपन्यांमध्ये स्फोटांची मालिका सुरूच आहे; परंतु कंपन्यांमध्ये नियमांची काटेकोरपणे बजावणी न केल्यानेच आशा घटना घडत असल्याचे आरोप येथील नागरिक करीत आहेत. या कंपनीतील पी. इ. ए. या प्लॅण्टमध्ये फिनाईल इथाईल ऍसिसेट हा द्रव्य पदार्थ बनविण्याचा प्लॅण्ट आहे. या प्लॅण्ट मध्ये तिसऱ्या मजल्यावर (एचसीएल) हायड्रोक्‍लोरीक लिक्विड केमिकल द्रव्यासाठी साठवणूक करण्यासाठी फायबर टाकीचा वापर केला होता. या टाकीमध्ये 210 लिटर एचसीएल केमिकल होते, यातील लिक्विडचा स्फोट झाला असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कंपनी सुरक्षा अधिकारी नामदेव हरीहर यांनी सांगितले.

  • स्फोटांच्या मालिका सुरूच
    कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये बऱ्याच वेळा कंपनी व्यवस्थापनाकडून नियम धाब्यावर बसवून कामे केली जात आहेत,यात बऱ्याच कामगार संघटनांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असला तरी तो आवाज दाबण्याचे प्रकार अन्य मार्गाने सुरू असते. येथील बरेच स्फोट रात्रीच्या वेळी झाल्याचे चित्र मागील स्फोटावरून स्पष्ट असल्याने व्यवस्थापनच बेफिकीर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
  • कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील स्फोटाची घटना समजल्यानंतर कंपनीतील स्फोट झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून, सरकारी स्तरावर कंपनीविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल.
    अखिल घोगरे, उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग, पुणे
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)