पुणे – माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा तथा आर. एम. डी. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल धारिवाल व उद्योजिका शोभा आर धारिवाल या दाम्पत्यांची कन्या जान्हवी आर धारिवाल यांचा शुभविवाह पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक, बालन ग्रुप तसेच
इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या सोबत पारंपारिक पद्धतीने, जैन धर्मातील पवित्र मंत्र तथा सप्तपदीने मोठ्या थाटात कोरेगांव पार्क येथील आर. एम. डी. हाऊस येथे संपन्न झाला .
यावेळी संपूर्ण आर. एम. डी. हाऊस मनमोहक व निरनिराळ्या फुलांनी सजविण्यात आले होते. लेन क्रमांक 3 येथून ढोल ताशा व विविध वाद्यांच्या संगीतमय उत्साही वातावरणात पुनीत बालन यांची विंटेज कारमधून निघालेली बारात अनेक सेलेब्रेटीज पाहुण्यांच्या नाच गाण्याने कार्यक्रम स्थळी पोहचली.
या विवाह सोहळ्यात मणिंदरजीत बिट्टा(आॅल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट दिल्ली ), पुणे मनपाचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी टेनिसपटू पद्मश्री लिएंडर पेस, पद्मश्री पंडित विजय घाटे, पंडित राकेश चौरसिया, क्रिकेटपटू इरफान पटेल आणि युसूफ पटेल, प्रसिध्द गायक संगितकार अजय-अतुल गोगावले, अभिनेत्री किम शर्मा, अभिनेता शरद केळकर, सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, जय भानुशाली, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त रवींद्र शिसवे, मनपा आयुक्त विक्रम कुमार, आमदार माधुरी मिसाळ, मेजर जनरल संजय विश्वासराव, लेफ्टंनट जनरल जे.एस. नेन (सदर्न कमान), ॲड. अनिकेत निकम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.