नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा प्रथमच बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येत आहे.
सीबीएसईची दहावी-बारावीची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 घेण्यात आली. आता सीबीएसईच्या दुसऱ्या टर्मची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा 26 एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुसरी टर्म ऑफलाइन घेण्यात येणार आहे.
करोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टर्मची डेटाशीट लवकरच जारी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरम्यान 5 जुलै 2021ला करोनामुळे बोर्डाने परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याची घोषणा केली होती.
दुसऱ्या टर्ममध्ये विद्यार्थ्यांना ऑबजेक्टिव्ह आणि सबजेक्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेसाठी सॅंपल पेपर पॅटर्न फॉलो करण्यात येणार आहे. डेटाशीट लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.nic.in जारी करण्यात येणार आहे.