Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

क्रिकेट काॅर्नर : रजत नव्हे सुवर्णयश

- अमित डोंगरे

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2022 | 2:16 pm
A A
क्रिकेट काॅर्नर : रजत नव्हे सुवर्णयश

रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी कधीही विजेतेपदापर्यंत जाऊ शकलेली नाही. मात्र, तरीही त्यांच्या संघातून खेळलेल्या अनेक खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आता याच यादीत आणखी एक नावाचा समावेश होण्याच्या उंबरठ्यावर आहे. हे नाव म्हणजे रजत पाटीदार. नावात जरी रजत असले तरी यंदाच्या स्पर्धेतील त्याची महत्त्वाच्या लढतींमधील कामगिरी सुवर्णयशाचीच आहे, यात शंका नाही.

यंदाच्या स्पर्धेत सुरुवातीच्या अनेक सामन्यांत त्याला संधीच मिळाली नव्हती. अर्जुन रावतला स्थान देत बेंगळुरुच्या संघ व्यवस्थापनाने आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली होती. त्यापूर्वी बेंगळुरुच्या बलाढ्य फलंदाजीला सुरुंगही लागला होता व त्यांचा डाव सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 68 धावांवर संपला होता. अखेर रावतकडून अपेक्षाभंग झाल्याने पाटीदारला संघात स्थान दिले व त्याचा पायगुण म्हणणे अवघड आहे, पण तो संघात आल्यावर विराट कोलहीलाही सूर गवसला व पाटीदारनेही आपली गुणवत्ता सिद्ध केली.

बेंगळुरुच्या संघाने रडत खडत का होईना व अन्य संघाच्या निकालांचा लाभ मिळाल्यामुळे म्हणा यंदाच्या स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर मात्र, त्यांनी गांभीर्याने खेळ केला. लखनौ सुपर जायंट्‌सविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीत त्यांनी विजय मिळवला व क्वालिफायर -2 लढतीत प्रवेश केला. त्या सामन्यात पाटीदारने धडाकेबाज नाबाद 112 धावांची शतकी खेळी करत कर्णधार फाफ डुप्लेसी, कोहली व संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवला.

तसेच क्वालिफायर -2 सामन्यातही तोच डाव पुढे सुरू केल्याप्रमाणे 58 धावांची खेळी करत पुन्हा एकदा आपली निवड सार्थ ठरवली. त्याच्या फलंदाजीत कॉपीबूक शॉट तर आहेतच पण इंम्प्रोवायझेशनची क्षमताही त्याने सिद्ध केली आहे. ऑफ साईडला जास्त सरस असला तरीही मनगटी कौशल्याच्या जोरावर तो लेगसाईडलाही दाद देत असल्याचे दिसते. त्याच्याकडे आक्रमकता, तंत्र, शॉट सिलेक्‍शनची नजर व सर्वात महत्त्वाचे म्हणजे खराब चेंडूंची वाट पाहण्यासाठीचा मोठा संयमही आहे. हीच त्याच्या मोठा खेळाडू बनण्याची लक्षणे आहेत.

1993 साली मध्यप्रदेशातील इंदूर येथे जन्मलेला पाटीदार आज 28 वर्षांचा असला तरीही त्याच्यासमोर किमान 7 ते 8 वर्षांची कारकीर्द आहे. यंदाच्या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघाच्या निवड समितीला निश्‍चितच प्रभावित केले आहे. देशांतर्गत स्पर्धेत मध्य प्रदेशकडून खेळताना प्रथम दर्जाच्या 39 सामन्यांतून त्याने 7 शतके व 14 अर्धशतके यांच्यासह 2 हजार 588 धावा केल्या आहेत. तर लीस्ट अ दर्जाच्या 43 सामन्यांत 4 शतके व 10 अर्धशतकेही साकारली आहेत. 38 टी-20 सामन्यांत त्याने 1 शतक व 8 अर्धशतके फटकावली आहेत. ही त्याची आजवरची चमकदार कामगिरी आहे. याच जोरावर तो भविष्यात रजत नव्हे तर सुवर्णयश मिळवताना दिसेल असा विश्‍वास आहे.

 

Tags: # IPL2022goldeniplperformanceRajat PatidarRoyal Challengers Bangalore

शिफारस केलेल्या बातम्या

गांगुली व जय शहा यांना दिलासा
क्रीडा

पैशांसाठी नव्हे तर गुणवत्तेसाठीच आयपीएल – सौरव गांगुली

2 weeks ago
तब्बल 44,075 कोटींना विकले आयपीएल मीडिया राइट्स
क्रीडा

तब्बल 44,075 कोटींना विकले आयपीएल मीडिया राइट्स

3 weeks ago
#IPL2022 | फर्ग्युसनचा चेंडू ठरला सर्वात वेगवान
क्रीडा

#IPL2022 | फर्ग्युसनचा चेंडू ठरला सर्वात वेगवान

1 month ago
पदार्पणातच गुजरातने कोरले IPL चषकावर नाव!
Top News

पदार्पणातच गुजरातने कोरले IPL चषकावर नाव!

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”

Most Popular Today

Tags: # IPL2022goldeniplperformanceRajat PatidarRoyal Challengers Bangalore

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!