नगर – पावसाळ्यापूर्वी विजेच्या तारांना टेकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. तारांचा झोळ कमी केला जातो. मात्र अशीच काळजी पावसाळा संपल्यानंतर घेतली जात नाही असे दिसते. त्यामुळे ट्रांसफॉर्मर वर लगडलेल्या वेलींचा विळखा वाढतांना दिसतोय.
याबाबत वीजवितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही वीज वाहन करणाऱ्या कोणत्याही वाहकाशी अन्य वाहकांचा संबंध आल्यास त्यापासून धोका संभवतो असे सांगितले मात्र शहरात अनेक ठिकाणी टृान्सफॉर्मरला लावलेल्या आधाराच्या खांबांवर वेलींचा विळखा वाढतांना दिसतोय यावेलींचा विळखा अगदी वरच्या तारांपर्यंत पोहोचलेला दिसतो त्यातून शॉर्ट सर्किट होण्याचा धोका संभवतो. शहरातील कोठला रस्ता, तारकपूर, केडगाव आणि अन्य भागातील रस्त्यांवरच्या विजेच्या खांबांवर वेली वाधलेल्या दिसतात त्याच बरोबर लहान मुलांच्या हाती लागतील असे ट्रान्फॉर्मर्सचे फ्यूज हे धोकादायक चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे. याबाबींची वीज वितरण कंपनीने दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.