रोहितने साकारले तीन विक्रम

अबुधाबी  -कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या खेळीदरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने तीन विक्रमांची नोंद केली.

या खेळीदरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या सुरेश रैनाला मागे टाकले आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहितने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

तसेच रोहितने खेळी जरी केवळ 33 धावांची केली असली तरीही त्याने चार चौकार फटकावले व कोलकाताविरुद्ध आयपीएलमध्ये 100 चौकार पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज बनण्याचा

मान मिळवला. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 हजार 509 धावा केल्या आहेत. रैनाच्या नावावर 5 हजार 495 धावा होत्या. या कामगिरीला रोहितने मागे टाकले.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहेत. त्याने 6 हजार 81 धावा केल्या आहेत. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन 5 हजार 619 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात रोहितने आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध 4 चौकार मारताच चौकारांचे शतक पूर्ण केले. यासह कोलकाताविरुद्ध 100 चौकार मारणारा तो पहिला फलंदाज बनला. रोहितने कोलकाताविरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या आणि स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज बनला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.