“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे जम्मू काश्मीर आणि लडाख…”; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन भारताने पाकिस्तानला झापलं

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदी संयुक्त राष्ट्राच्या एका सभेला संबोधित करणार आहेत. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आवळला आहे. खान यांच्या संबोधनाला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्यांना आश्रय देण्याचा इतिहास पाकिस्तानच्या नावे आहे, असा टोला भारताने शेजारच्या राष्ट्राला लगावला आहे.

जागतिक स्तरावरील सर्वात महत्वाच्या मंचावरुन भारताने शनिवारी हे स्पष्ट केले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. तसेच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतदवाद्यांना समर्थन देणारा देश असल्याचा उल्लेख करत इम्रान खान यांच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानवरच निशाणा साधला आहे.

भारताने पाकिस्तानवर हल्लाबोल करताना दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केला आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर, “जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि भविष्यातही कायमच तसाच राहील,” असे पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

पाकिस्तान स्वत:ला आगीशी खेळणारा देश असे मानतो. मात्र त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याने त्याची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत असल्याचेही भारताने म्हटले आहे. अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहे. यापूर्वी भारताने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे.

जागतिक स्तरावरील सर्वात महत्वाच्या मंचावरुन भारताने शनिवारी हे स्पष्ट केले आहे की जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. तसेच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतदवाद्यांना समर्थन देणारा देश असल्याचा उल्लेख करत इम्रान खान यांच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानवरच निशाणा साधला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.