पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील रस्ते जनता कर्फ्यूमुळे ओस पडले होते. नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. त्यामुळे गावा गावांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. शिरुर ते मंचर रस्ता, नारायणगाव ते पिंपरखेड-शिंगवे रस्ता आदी रस्त्यांवर वाहतूक बंद असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यूला जनतेने पाठिंबा दिला.