केडगाव-परिसरातील नागरिकांनी जनता कर्फ्यूचे पालन करत प्रतिसाद दिला. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जनता कर्फ्यूची घोषणा केली होती, त्याला शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. केडगाव या ठिकाणी सर्व लहान मोठे व्यापारी, विक्रेते, नागरीक आणि मजूर वर्ग यांनी मोठा प्रतिसाद दिला. केडगाव मुख्य बाजारपेठेत आसपासच्या दहा पंधरा गावातील नागरीक दैनंदिन कामानिमित्त येतात परंतु आज मात्र या ठिकाणी शुकशुकाट दिसून आला.