शिरूर -शिरूर शहरातील रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा (आरएमडी) 100 टक्के निकाल लागला आहे. आरएमडी शाळेमध्ये आकांक्षा साळके (97.40 टक्के) प्रथम, तन्मय देसर्डा 95.20 टक्के, अंकिता मलगुंडे 95.20 टक्के, यशराज दुधे 94.80 टक्के.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा, उपाध्यक्ष चंद्रकांत बाफना, आरएमडी शाळेचे अध्यक्ष शिरीष, सचिव तु. म. परदेशी, सचिव बाबासाहेब चोरमले, मुख्याध्यापिका अश्विनी घारू यांनी अभिनंदन केले.