रितू नंदा यांचे निधन

नवी दिल्ली : राज कपूर यांची कन्या आणि श्‍वेता बच्चन यांच्या सासू रितू नंदा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्ष त्या कर्करोगाशी झूंजत होत्या. ही झूंज अखेर सोमवारी रात्री संपली.

दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिषेक बच्चन, रिध्दीमा कपूर सहानी, हृषी कपूर, रणधीर कपूर आणि अर्मान जैन आदी दिग्गज यावेळी उपस्थित होते.अंत्यसंस्कारासाठी मुंबईतून दिल्लीला मृतदेह नेत असताना मुंबई विमानतळावर ऐश्‍वर्या रॉय आणि अमिताभ बच्चन उपस्थित होते.

नंदा यांची नव्या नवेली ही नात आणि अगास्त्य हा नातूही अंत्यदर्शनासाठी उपस्थित होता. शोकमग्न नव्याचे अभिषेक बच्चन सांत्वन करत होता.

रितू नंदा यांचा जन्म 1948मध्ये झाला. त्यांनी चित्रपट उद्योगापासून स्वत:ला दूर ठेवले. त्यांनी उद्योग व्यवसायात आणिआयुर्विम्याच्या क्षेत्रात नाव लौकीक कमावला होता. राजन नंदा या उद्योगपतीशी त्या विवाहबध्द झाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.