Amitabh Bachchan Hospitalized । बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिग बींना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आलीय.
बिग बींनी पोस्ट करत दिली माहिती Amitabh Bachchan Hospitalized ।
एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना आज पहाटे कडक सुरक्षेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
T 4950 – in gratitude ever ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 15, 2024
दरम्यान, बिग बी यांनी आज दुपारी ट्विटरवर पोस्ट शेअर केली. त्यात “नेहमी कृतज्ञता,”असा मजकूर लिहिला आहे. शस्त्रक्रियेनंतर अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार व्यक्त केल्याचे मानले जात आहे.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघंही स्ट्रिट प्रीमियर लीगच्या फायनल्सना गुरुवारी ठाण्यात उपस्थित होते. दादोजी कोंडदेव मैदान या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. आता अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सहा वाजता मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे.
अमिताभ यांनी जलसाबाहेर चाहत्यांची भेट घेतली Amitabh Bachchan Hospitalized ।
आम्ही तुम्हाला सांगतो की अमिताभ बच्चन यांचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे आणि त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. बिग बींच्या घराबाहेर त्यांना भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चनही दर रविवारी त्यांच्या घराबाहेर चाहत्यांना भेटतात. काल अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना भेटतानाची ही छायाचित्रे त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केली होती. त्यासोबत बिग बींनी ‘हंबल्ड बियॉन्ड’ असे लिहिले होते.
अमिताभ बच्चनचे आगामी चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बिग बींचा मागचा चित्रपट टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननसोबत ‘गणपत’ होता.