जाणून घ्या आज (14 जानेवारी) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रामकृष्ण मिशन मठातील भाषणावर साधू नाराज
मठ राजकीय संदेश देण्याचे व्यासपीठ नसल्याचा साधुंचा खुलासा

2. सीएए विरोधात केरळ सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव
कायदेशीर भूमिका घेणारे केरळ ठरले देशातील पहिले राज्य

3. जम्मू-काश्‍मीरमध्ये हिमकडा कोसळून तीन जवानासह आठ जणांचा मृत्यू
दुर्घटनेत एक जवान बेपत्ता..शोधकार्य सुरू

4. माझी किंमत दोन हजारापेक्षा जास्त, कॉंग्रेसवाल्यांनी दर वाढवावा
खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा कॉंग्रेसवर अप्रत्यक्षरीत्या पैसे वाटपाचा आरोप

5. भाजपा सरकारने तर खिसा कापून पोटावर लाथ मारली
महागाईवरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींची भाजपवर टीका

6. भारतातील सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आणि दुर्दैवी
सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेलांनी व्यक्‍त केली नाराजी

7. आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ
बोनसची रक्कम परत मागण्यासाठी बॅंकेकडून न्यायालयात याचिका दाखल

8. अमेरिकन भारतीयाला इराणबद्दलची मस्करी पडली महागात
अमेरिकेतफेसबूक पोस्ट केल्यामुळे भारतीयाची गेली नोकरी

9. शिवसेनेऐवजी ठाकरे सेना असे नाव करा आणि मग बघा काय होतंय ते
उदयनराजे भोसले यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

10.दीपिका पदुकोणला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची आवश्‍यकता
योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला दीपिकाला सल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.