India T20 Team For South Africa T20 & ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. BCCI ने आफ्रिकेविरुद्धच्या T20 आणि ODI मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. T20 मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल तर एकदिवसीय संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेत चांगली कामगिरी करत असलेल्या नवोदित क्रिकेटपटू रिंकू सिंगचा देखील आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर रिंकू सिंगने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.”
पुढे तो म्हणाला की, यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहुनच निवड समितीने मला संधी दिली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सातत्य दक्षिण आफ्रिकेविरुद्धही कायम राखण्याचाच प्रयत्न करत राहणार आहे. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेद्वारे पूर्ण झाले. आता येत्या काळात दक्षिण आफ्रिकेतही दर्जा सिद्ध करत आगामी काळात होत असलेल्या विविध मालिकांबरोबरच पुढील वर्षीच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठीही संघातील स्थान कायम राहील यासाठी प्रत्येक सामना गांभार्याने खेळणार आहे.
यंदाच्या मोसमात सातत्याने धावा करण्यात यश आले. त्यासाठी घेतलेली मेहनतही यशस्वी ठरली. आता यापुढील काळात मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचाच माझा प्रयत्न राहील, असे मत भारताचा नवोदित क्रिकेटपटू रिंकू सिंगने व्यक्त केले आहे.
#INDvSA T20I Series : बीसीआयनं टीम इंडियाची केली घोषणा; T20I कर्णधारपदाची धूरा ‘या’ खेळाडूकडे…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया – यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपाध्यक्ष) कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर.