मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन राज्यातील टोल वसुली आणि दुकानांबाहेर मराठी पाट्या लावण्याची सक्ती या विषयांवर चर्चा केली.मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी ही बैठक झाली. (MNS)
या आठवड्याच्या सुरूवातीस, ठाकरे यांनी दुकाने आणि इतर आस्थापनांवर मराठी साइनबोर्ड लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली होती. राज्यातील सत्ताधारी युती मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर केवळ आव आणते असा आरोप त्यांनी केला होता. (Marathi patya)
सुप्रीम कोर्टाने यापूर्वी दुकानदारांना त्यांच्या आस्थापनाबाहेर मराठी फलक लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती (जी 25 नोव्हेंबर रोजी संपली) आणि उल्लंघन करणार्यांना प्रतिदिन 2,000 रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले होते.या विषयाबरोबरच टोलचाही मुद्दा मनसेने उचलू धरला होता. (Raj thackeray cm shinde)
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. एकनाथराव शिंदे ह्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारतर्फे सन्मा. मंत्री महोदय श्री. दादाजी भुसे ह्यांच्यासोबत माझ्या घरी ‘शिवतीर्था’वर एक बैठक झाली होती. त्या बैठकीत ‘नागरिकांकडून होणारी अमाप टोलवसुली,… pic.twitter.com/Z0I1HyMU4p
— Raj Thackeray (@RajThackeray) December 2, 2023
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत एक्सवरून
यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते आमदार राजू पाटील हेही उपस्थित होते, त्यांनीही आपल्या मतदारसंघातील आणि महानगरातील महत्त्वाचे विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. सर्वच मुद्द्यांचा साकल्याने आढावा घेऊन महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावलं उचलेल अशी अपेक्षा देखील ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.(Thackeray shinde meet)