Nepal Temperature – नेपाळमध्ये (Nepal) गेल्या महिन्याभरात कडाक्याच्या थंडीमुळे (nepal winter) किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम नेपाळमधील भूकंपग्रस्त जजारकोट आणि रुकुम पश्चिम प्रांतांमधील भूकंपग्रस्तांचा या मृतांमध्ये समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. मृतांपैकी २८ जण वयाची पन्नाशी ओलांडलेले होते आणि तिघे जण अल्पवयीन होते, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
दिनांक ३ नोव्हेंबरला पश्चिम नेपाळमधील जजारकोट जिल्ह्याला ६.४ क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्यामध्ये १५४ लोक ठार झाले होते. तर शेकडो जण जखमी झाले होते. भूकंपामुळे २६ हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली होती.
गर्भवती महिला, लाहन मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सुमारे ४० हजार लोक भूकंपामुळे बेघर झाले असून त्यांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. कडाक्याच्या थंडीचा सर्वाधिक फटका या लोकांना बसतो आहे. आश्रय छावण्यांमध्ये लोकांना थंडीपासून वाचण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. येथे पुरेशी ब्लॅकेट देखील उपलब्ध नाही. या थंडीमुळे आणखीन बळी जाऊ शकतात, असे अधिकार् यांनी म्हटले आहे.