पृथ्वीराज कपूर यांच्या खानदानमधील मुलींनी चित्रपटांत काम केले नाही. त्यांच्या ज्या सुना अभिनेत्री होत्या त्यांनीही कपूर घराण्याची सून झाल्यावर चित्रपट करणे बंद केले.
याला अपवाद करिश्मा कपूर, करिना कपूर आणि शशी कपूर यांची मुलगी संजना कपूर. त्यातल्या त्यात संजनाने मोजकेच एक का दोन चित्रपट केले व नंतर ती पृथ्वी थिएटरच्या कामकाजात व्यस्त झाली. करिना आणि करिश्मा अजूनही सक्रिय आहेत.
राजकपूर यांचा द्वितीय चिरंजीव ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची कन्या रिद्धिमाही तिच्या अन्य बहिणींप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त सुंदर आहे. रणबीरची बहीण असलेली रिद्धिमा चित्रपटांत मात्र आली नाही. वास्तविक तिलाही अनेक ऑफर होत्या. वयाच्या 16 व्या 17 व्या वर्षापासून आपल्याला चित्रपटांच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली.
माझी आई मला त्याची माहिती द्यायची. मात्र, त्याचे करायचे काय, हे आपल्याला माहीत नव्हते, असे रिद्धिमाने एका मुलाखतीत सांगितले. नंतर ती परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेली. तेथेही तिला ऑफर येत होत्या. पण त्यावर तिने काहीच विचार केला नसल्याचे ती म्हणते. शिक्षण झाल्यावर ती भारतात परत आली.
मात्र, तिचे लगेचच लग्नही झाल्याचे ती म्हणते. रििद्धिमा आता एक प्रथितयश फॅशन डिझायनर आहे. या क्षेत्रात तिला चांगले यश मिळाले आहे. मात्र, जर इकडे आलो नसतो तर आपण एकतर कुक झालो असतो किंवा योगा टीचर झालो असतो असे ती म्हणते.