स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहे. शुक्रवारी त्यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त ही घोषणा करण्यात आली. या बायोपिकचे शुटिंग लंडन, अंदमान आणि निकोबार आणि महाराष्ट्रात होणार आहे. या चित्रपटातील कलाकार आणि अन्य तपशील अद्याप जाहीर केले गेलेले नाहीत. यापूर्वी सावरकरांवर एक बायोपिक झालेला आहे.
संगीतकार-गायक सुधीर फडके हे त्याचे निर्माते होते. आता सावरकरांच्या कामावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी हा नवीन सिनेमा केला जात आहे. वीर सावरकर हे भारताच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, त्यांच्याबद्दल अधिक सांगायला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने सावरकरांबद्दल फार कमी लेखन झाले आहे.
त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल फार माहिती नाही, असे निर्माते अमित वाधवानी म्हणाले. वीर सावरकरांचा जितका आदर केला जातो आणि तितकीच टीकाही केली जाते. आज त्यांचा विसर पडला आहे, असे निर्माते संदीप सिंह म्हणाले. आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे ते एक महत्त्वाचे भाग होते आणि त्यांच्या जीवन प्रवासाची झलक देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. लवकरच या बायोपिकचा तपशील समजेल.