मुंबई – बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून रिचा चड्डाला ओळखले जाते. तर बॉलीवूडमध्ये ‘गुड्डू भैया’ नावाने प्रसिद्ध असलेले आणि आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांनाच प्रेमात पाडणाऱ्या ‘अली फैजल’ला कोण ओळखत नाही. रिचा आणि अली हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबर महिन्यात दोघांचा विवाह संपन्न होणार आहे.
बोल्ड भूमिका असो वा ऐन तारुण्यात म्हातारपण दाखवणारे कॅरेक्टर असो रिचाने नेहमीच अभिनय करताना आपली वेगळी छाप पाडली आहे.डान्स असो की बॉडी अली देखील अभिनय करताना प्रत्येक पात्राला न्याय देतो. हे दोन्हीही स्टार २०२० मध्येच लग्न करणार होते परंतु कोरोनाकाळात त्यांनी आपला विवाह पुढे ढकलल्याचा चर्चा आहेत. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावरून एकमेकांसोबतचे फोटोज अनेकदा शेअर केले आहेत.
सप्टेंबर महिन्यात लग्नाबाबतचे २ प्रोग्रॅम होणार असल्याची माहिती इंग्रजी वृत्तवाहिनीने दिली आहे. ज्यानुसूर एक कार्यक्रम मुंबईमध्ये तर दुसरा कार्यक्रम दिल्लीत होणार असल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमांमध्ये कौटुंबिक पाहुण्यानाच आमंत्रित केलं जाणार आहे.
फुकरेमुळे आले एकत्र
बॉलीवूडमध्ये आलेला फुकरे या सिनेमा चांगलाच गाजला होता. तरुण मुलांच्या मजामस्तीवरील हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. याच चित्रपटात पहिल्यांदा रिचा आणि अलीने सोबत केले होते तेव्हापासून त्यांची मैत्री झाली. या चित्रपटात रिचाने भोली पंजाबन तर अलीने जफर भाईची भूमिका साकारली होती. या चित्रपटनानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले होते, एका मुलाखतीत रिचाने आपले लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले असल्याचे देखील सांगितले होते.