फलटण – फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून ११ लाख रुपये घेऊन ये, या कारणावरुन निरगुडी (ता. फलटण) येथील विवाहितेचा जाचहाट करुन विवाहितेच्या वडील आणि भावाला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तिचा पती, दिर, नणंद, सासू आणि सासरे अशा आठ जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून ११ लाख रुपये घेऊन ये या कारणावरुन शुभांगी चंद्रशेखर गायकवाड (वय २५, रा. निरगुडी, सध्या रा. गोखळी) यांना पती चंद्रशेखर हनुमंत गायकवाड, सासरे हनुमंत भगवान गायकवाड, सासू मंदा गायकवाड, दीर शुभम गायकवाड, चुलत सासरे विश्वास भगवान गायकवाड, चुलत सासू हेमलता गायकवाड, चुलत दिर शंभू विश्वास गायकवाड (सर्व रा. निरगुडी) आणि नणंद राणी स्वप्निल ठोंबरे (रा. ङिस्कळ ता. खटाव) यांनी फिर्यादी शुभांगी गायकवाड यांचा जाचहाट करुन वडील आणि भावाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या गुन्ह्याप्रकरणी हवालदार पेंदाम तपास करीत आहेत.