Mirzapur Season 3 – मुन्ना भैय्या आणि गुड्डू पंडित यांच्या हाणामारीला मिस करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. मिर्झापूरचा तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मिर्झापूरच्या नव्या सिजनचे शूटिंग पूर्ण झाले असल्याची माहिती अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने दिली होती.
श्रिया पिळगावकर, दिव्येंदु, पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, अशी दमदार स्टार कास्ट असल्यामुळे मिर्झापूरच्या दोन्हही सिजनला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. यातील मुन्ना भैय्याची शिव्या देण्याची स्टाईल असो वा गोलूची हटके फायटिंग असो चाहत्यांना प्रत्येक गोष्ट आवडली होती. यामुळेच चाहत्यांना तिसऱ्या सीजनची उत्कंठा लागली आहे.
मिर्झापूर 3 कधी प्रदर्शित होणार याबाबतही बातम्या समोर आल्या आहेत. GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मिर्झापूर 3 मार्चच्या शेवटच्या आठवड्यात Amazon प्राईम वर रिलीज होऊ शकतो. मिर्झापूर 3 च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. । Mirzapur Season 3
निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण मिर्झापूर सीझन 3 मध्ये पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा कालिन भैयाच्या भूमिकेत दिसणार असून, यामध्ये कालिन भैयाचा मुलगा यात पुन्हा एंट्री करणार आहे. । Mirzapur Season 3
अली फजल पुन्हा एकदा गुड्डू पंडितच्या भूमिकेत दिसणार आहे. बदला घेण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज आहे. दिव्येंदू देखील मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत मिर्झापूर 3 मध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. रसिका दुग्गल बीना त्रिपाठी आणि श्वेता त्रिपाठी शर्मा गजगामिनी उर्फ गोलू गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. । Mirzapur Season 3