Entertainment । संजय लीला भन्साळी सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित पीरियड ड्रामा ‘हिरामंडी: द डायमंड बझार’मुळे चर्चेत आहेत. या मालिकेद्वारे तो ओटीटीवर पदार्पण करणार आहे. त्याची घोषणा झाल्यापासून चाहते भन्साळींच्या या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे.
भन्साळींच्या या मालिकेत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल दिसणार आहेत. आता रिचाने या मालिकेबाबत एक मजेशीर खुलासा केला आहे. मालिकेत वास्तवाची झलक देण्यासाठी भन्साळींनी वेशभूषेवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे, असे अभिनेत्रीने सांगितले. शूटिंगवेळी मूळ जुने दागिने आणि कपडे वापरले. असेही तिने सांगितले आहे.
सिनेविस्टार इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2024 (CIFF) दरम्यान रिचाने ‘हिरामंडी’शी संबंधित अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी सांगितले की,’आम्ही घातलेले सर्व दागिने खरे होते, हे दागिने जरी ते तीन-चार किलोचे असले तरी ते सर्व खरे आणि सर्व जुने दागिने आहेत. यामध्ये जुन्या कपड्यांचा वेशभूषा म्हणून वापर करण्यात आला आहे.
या मालिकेत रिचा ‘लज्जो’च्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रिचा म्हणाली, “भूमिकेत बसण्यासाठी मला उर्दूचे अनेक क्लासेस घ्यावे लागले. त्यामुळे मला त्यात सुधारणा करावी लागली. मी लहान असताना एक दशक कथ्थक शिकले.’निर्मात्यांनी अलीकडेच मालिकेतील सर्व सुंदरींचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. सर्व अभिनेत्री पारंपारिक पोशाखात दिसल्या होत्या.