पुणे: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व विभागीय क्रीडा संकुल समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पुणे, मुंबईच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. त्यातही पुण्याच्या रिया केळकरने ही स्पर्धा गाजविली.
चौदा वर्षांखालील गटाच्या ऑलराऊंड प्रकारात पुण्याच्या रिया केळकरने 39.80 गुणांची कमाई करीत अव्वल स्थान मिळवले. रिया सुरुवातीपासूनच या स्पर्धेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. तिच्या हालचालींमधील कसब प्रेक्षकांना थक्क करुन सोडणारे असेच होते.
पुण्याच्याच तन्वी कुलकर्णीने 38 गुण घेत द्वितीय स्थान मिळवले. औरंगाबादच्या देवयानी कोलते (37.25), व सुहानी अडने (37.10) यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळविले. क्रीडा प्रबोधिनीच्या आर्या परबने 37.10 गुण घेत पाचवे स्थान मिळवले. याशिका पुजारी (36.65), रिया सावंत (36.50), साताक्षी टक्के (35.85), सृष्टी भावसार (35.60), स्वरा गोडबोले (35.10) या खेळाडूंनी पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबईच्या अदयान देसाईने 61.400 गुणांची कमाई करीत जेतेपद मिळवले. मुंबईच्याच रुद्र चाफेकरने 60.300 गुण घेत उपविजेतेपद मिळवले