भाजे धबधबा पर्यटनावर निर्बंध 

कार्ला  – पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या मावळ तालुक्‍यातील भाजे धबधबा, भाजे लेणी, पाटण धबधबा, लोहगड, विसापूर किल्ल्याकडे जाणाऱ्या वाहनांना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ शनिवार व रविवार या दिवशी सायंकाळी चार वाजल्या नंतर बंद केला जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक दीपक लुकडे यांनी दिली.

पावसाळ्यात मावळ तालुक्‍यातील लोणावळातील भुशी डॅम नंतर दुसरे पर्यटकांचे पसंतीचे स्थळ म्हणजे कार्ला परिसरातील भाजे धबधबा. परंतु, मुंबई-पुणेसह महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या शनिवार व रविवारी हजारोंच्या घरात जाते. यामुळे वाहनांची संख्या जास्त होत असल्याने कार्ला फाट्यापासून मळवली, पाटण, भाजे, लोहगड, विसापूर, कार्ला परिसरातील रोडसह राष्ट्रीय मुंबई-पुणे महामार्गावर देखील वाहतूक कोंडी होऊन पोलीस प्रशासनाबरोबरच स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या गर्दीवर व वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कार्ला फाट्यावर भाजेकडे जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध घातले असून सायंकाळी साडे पाच वाजल्यानंतर धबधब्यावरील पर्यटकांना देखील त्यांच्या सुरक्षिततेसाठी तेथून काढण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुर्ण परिसर खाली केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.