धोनीने ‘हे’ काम केले असते तर भारत जिंकला असता – शोएब अख्तर 

नवी दिल्ली –  शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली. न्यूझीलंडने हा सामना १८ धावांनी जिंकला व अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या पराभवानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या. पाकिस्तानी नागरिकांनीही यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. परंतु, पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब अख्तरने नेहमीच भारतीय संघाला समर्थन दिले आहे. भारतीय संघाच्या खेळीवर भारतीय चाहत्यांना आनंदी व्हायला पाहिजे. यावेळी शोएबने एमएस धोनीचे कौतुकही केले. परंतु, धोनीने एक खास काम केले असते तर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला असता, असेही त्याने आपली युट्युब चॅनेलवर म्हंटले आहे.

शोएब अख्तर म्हणाला कि, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीच्या खेळीमुळे भारत उपांत्य फेरीत विजयाच्या नजीक पोहचला होता. पहिल्या फळीतील फलंदाजांनी खराब फलंदाजी केली. रोहित शर्मा चांगल्या चेंडूवर आउट झाला. विराट कोहलीला आउटचा देण्याचा निर्णय दुर्देवी होता. चेंडू केवळ बेलवर लागला होता तरीही अंपायरने कोहलीला आउट दिले. त्या चेंडूवर कोहली षटकार मारू शकला असता. यानंतर जडेजा मैदान उतरेपर्यंत कोणत्याही खेळाडूने चांगले प्रदर्शन केले नाही. धोनीनेही सामन्यात भारताचा डाव सांभाळला. धोनीने धाव करताना ड्राईव्ह मारला असता तर तो धावबाद झाला नसता आणि भारत विजयी झाला असता, असे विश्लेषण शोएबने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.