पुणे – शहरातील करोनाचा संसर्ग कमी होत असताना टप्याटप्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. या आठवड्यातही निर्बंध आणखीन शिथिल होतील, अशी अपेक्षा असताना शहरातील पुन्हा वाढलेला बाधित दर लक्षात घेता येत्या सोमवारपासूनपुन्हा निर्बंध वाढवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने सायंकाळी 5 वाजेनंतर संचारबंदी लागू असेल.
करोनाची दुसरी लाट काहीशी आटोक्यात असताना, आता डेल्टा प्लस करोना विषाणूत उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेल्या प्रकाराचा धोका सरकारने वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यासाठी नवीन प्रतिबंधात्मक नियामवली जाहीर केली आहे. पुणे शहरात सध्या रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी वाढती गर्दी, बदलते हवामान आणि नवीन विषाणूच्या प्रकारचा धोका लक्षात घेऊन नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे.
या सुधारित आदेशामध्ये अत्यावश्यक सेवांची दुकानेवगळता इतर दुकाने केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवार ही दुकाने बंद असतील. त्यामुळे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांसाठीचे वीकेंड लॉकडाऊन कायम असेल.
असे आहेत नियम
* उद्याने आणि मैदाने केवळ सकाळी 5 ते 9 या वेळेतच सुरू
* खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
* मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, संपूर्णत: बंद.
* रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी
* 4 वाजेपर्यंत. केवळ पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू.
* लोकल ट्रेन फक्त वैद्यकीय, अत्यावश्यक आणि शासकीय सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी.
* सर्व प्रकारच्या कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत, तर सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद.
* अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी 20 लोकांची उपस्थिती.
* शेतीसंबंधित दुकाने, शेतमालाची विक्री दुपारी 4 वाजेपर्यंत.
* सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी, त्यानंतर संचारबंदी
* पीएमपीएमएल बसेस 50 टक्के क्षमतेने धावणार.
* मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार
* दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.