सोसायटीच्या चेअरमनला धमकावल्याप्रकरणी ऍक्ट्रेस पायल रोहतगीला अलीकडेच अहमदाबादमध्ये अटक करण्यात आली होती. व्हॉटस ऍप आणि सोशल मीडियावरून पायलने ही धमकी दिली होती असे समजते आहे.
याप्रकरणी डॉ, पराग शहा यांनी पायलच्या विरोधात अहमदाबादमधील सॅटेलाईट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पायल ज्या सोसायटीमध्ये राहते आहे, त्याच सोसायटीमध्ये डॉ. परागदेखील राहात आहेत.
पायलने सोशल मीडियावर आपल्याला शिवीगाळ केली आणि सोसायटीच्या व्हॉटस ऍप ग्रुपवर आपल्याबाबत अत्यंत हीन भाषेतील टीका केली होती, असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. आपल्याशी जो कोणी वाद घालेल, त्याचे पाय तोडण्याची धमकी पायलने दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.
सोसायटीतील सामायिक मतदानाच्या वापरावरून पायल आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाले होते. त्यानंतर पायलने ही अरेरावीची भाषा वापरायला सुरुवात केली होती. पोलिसांनी पायलला अटक करून तिची वैद्यकीय तपासणीदेखील केली असल्याचे समजते आहे. ट्विटरने तिचे ट्विट अकाऊंटदेखील स्थगित केले होते.