पिंपळे गुरव, (वार्ताहर) – दापोडी, फुगेवाडी परिसरातील अंतर्गत नाल्यांची साफसफाई पावसाळ्याआधी करण्यात यावी. परिसरात पडणारा कचरा, राडारोड्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आनंदवन, गुलाबनगर, बॉम्बे कॉलनी आदी परिसरातील सांडपाणी, गटार, कचरा व पावसाने आलेल्या गाळामुळे अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत. अवकाळी पावसात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी तुंबले होते. पावसाळ्याआधी संपूर्ण प्रभागातील नालेसफाई स्वच्छता कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
87 कामे करण्यात यावीत. पावसाळ्यात नाल्याचे पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. – मोहन कांबळे, रहिवासी.
कासारवाडी, फुगेवाडी परिसरात 66 मनुष्यबळाच्या साहाय्याने स्वच्छतेचे काम सुरू आहे. मोठे नाले स्वच्छता करण्यासाठी जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने सुरुवात करण्यात येणार आहे.
– सचिन जाधव, सहायक आरोग्य निरीक्षक, दापोडी.