बिजींग – वैद्यक शास्त्राचा दुरूपयोग करून जनेटिकली एडिटेड अर्भकांना जन्म देणाऱ्या तीन संशोधकांना चीन मध्ये कारावासीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांनी प्रयोग शाळेत काही प्रयोग करून त्यातून नवीन संकरीत मानवी अर्भकांना जन्माला घातले होते. या भीषण संशोधन प्रकल्पातील प्रमुख संशोधक हे जीआनकुई याला तीन वर्षाचा कारावास आणि तीन दक्षलक्ष युआन दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
तर त्याचे दोन संशोधक साथीदार झांग रेनील याला दोन वर्षाचा कारावास आणि कीन जिंझोऊ याला अठरा महिन्याच्या कारावासाची व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी आपल्या संशोधनातून नवीन संकरीत जातीच्या मानवी अर्भकांना जन्म दिल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या दाव्याने शास्त्रज्ञांचे जग हादरले होते. एक पुरूष जातीचे अर्भक आणि दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.
ही जनेटिकली एडिटेड बालके कशी जन्माला घातली याचा तपशीलही या संशोधकांनी एपी वृत्त संस्थेला दिलेल्या मुखतीत सांगितला आहे. अशा प्रकारे मानवाच्याच नवीन प्रजाती जन्माला घालणे नैसर्गिक व तात्विकदृष्ट्या योग्य आहे काय यावर जगभर चर्चा झाली आहे. त्यानंतर चीनने या तिन्ही संशोधकांवर खटले दाखल केले. त्यांच्यावर वैद्यक शास्त्राचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोर्टात जे पुरावे सादर झाले त्यात त्यांनी तीन नव्या प्रजातींच्या अर्भकांना जन्माला घातले असल्याचे सिद्ध झाले आहे.
यातील प्रमुख संशोधक हे हा अमेरिकेत वैद्यक शास्त्र शिकला आहे. त्याने चीनच्या शेनझेन प्रांतात साऊदर्न युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ऍन्ड टेक्नॉलाजीमध्ये आपली प्रयोग शाळा उघडून तेथे त्यांनी नवीन मानवजात निर्माण करण्याचा हा उद्योग केला होता.