रिपब्लिक टीव्हीचे ‘पेड टीआरपी’ घोटाळ्यात नाव; संजय राऊत म्हणतात…

मुंबई – पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे नाव आले आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आज फक्त मराठी व बॉक्स सिनेमाच्या चालकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे.

दरम्यान, पेड टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे नाव आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ते लिहतात, “मुंबई पोलीस आयुक्तांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिक टीव्हीने टीआरपी विकत घेतल्याचा संशय असल्याचं म्हंटलं. यावेळी राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये #असत्यमेवजयते असा हॅशटॅग वापरत रिपब्लिक टीव्हीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


तत्पूर्वी, रिपब्लिक वृत्तवाहिनेचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी सुशांत मृत्यूप्रकरण व त्यानंतर घडलेल्या कंगना प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये गोस्वामी यांनी केलेल्या पत्रकारितेवरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही मांडण्यात आला होता.

हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबई पोलिसांनी पेड टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्ही चालकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.