सातारा (प्रतिनिधी) – सातारा व कोरेगावच्या कक्षातील ५६ जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यापूर्वी सकाळी तरडगावचा सहा वर्षांचा मुलगा व सातारा कारागृहातील दोन कैदी पाँझिटिव्ह आले होते
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पुणे कारागृहातून सातारा कारागृहामध्ये प्रवास करुन आलेले २ कैदी (वय वर्षे ३१ व ५८) व फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित १ (वय वर्षे ६) अशा एकूण ३ नागरिकांचा करोना (कोविड १९) अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते करोना बाधित असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा कारागृहातील एकूण चार कैदी करोनाबाधित झाले आहेत तर तरडगावमधील करोनामुक्त तरुणीच्या कुटुंबातील मुलाला लाग झाली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ४०, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील १६ अशा ५६ नागरिकांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
आता सातारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७७ झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ रुग्ण (कोविड १९) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.