बारामती (प्रतिनिधी ) – बारामती सुरू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवू नका अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.
बारामती शहर व तालुक्यातील कोरूना रोखण्यात यश आले असले तरीदेखील बारामती बंदच राहणार आहे. बारामती सुरू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. बारामतीमधील नागरिकाच्या सतर्कतेमुळे, सहकार्यामुळे व शिस्तीमुळे बारामती मधील कोरोना व्हायरसचे थैमान रोखण्यात यश आले आहे. परंतु सोमवार दि( 4) मे पासून बारामतीमधील आस्थापना,व्यवहार सुरू होणार आहेत अश्या अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात आहेत.
वास्तविक शासनाने परवानगी दिलेल्या MIDC मधील काही कंपन्या शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सुरु करण्यात येतील अन्य कोणतेही व्यवहार अगर आस्थापना सुरू करण्यात येणार नाहीत. असे नारायण शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे.आतापर्यंत बारामती मधील नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य केले तसेच सहकार्य पुढील लॉकडॉनच्या कालावधीत आवश्यक आहे. बारामती सुरू होणार असल्याच्या अफवाजो कोणी अफवा पसरवेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल.