एकूण रुग्णसंख्या ७१८ वर..
सातारा (प्रतिनिधी) :जिल्ह्यात शुक्रवारी १५ जणांना करोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ७१८ झाली आहे.
विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा दिली. त्यापूर्वी सकाळी महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर येथील महिला पाँझिटिव्ह आली होती.
आज रात्रीच्या या बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील २४ वर्षीय पुरुष; कराड तालुक्यातील तुळसण ५० वर्षीय व २२ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष; सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील ७४ वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील २३ वर्षीय महिला व ५ वर्षाची मुलगी, सैदापूर येथील २३ वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील ४४ वर्षीय महिला; कोरेगाव तालुक्यातील साप येथील ३९ वर्षीय पुरुष; जावळी तालुक्यातील धोंडेवाडी येथील ५१ वर्षीय महिला व २५ वर्षीय पुरुष; खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ५३ वर्षीय पुरुष; वाई तालुक्यातील वेळे येथील ५० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७१८ रुग्ण आढळले आहेत. ४७२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये २१३ जणांवर उपचार सुरु असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.