पाचगणी (प्रतिनिधी) – वाहतुकीला अडथळा केल्याबद्दल महाबळेश्वरमधील एका प्रसिद्ध हॅाटेलविरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील ‘ली मेरीडीयन’ हॉटेलसमोर वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग करुन महाबळेश्श्वर ते मेढा रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण,
केल्याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन ली मेरीडीयन हॉटेलच्या व्यवस्थापनाविरुध्द वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून पोलीस निरीक्षक नलावडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.