पाचगणी (प्रतिनिधी) – घरफोडी व चोरी करणाऱ्या संशयितांना जेरबंद करुन पाचगणी पोलीसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने व इतर मुद्देमाल जप्त केला. पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत नवीन बांधकाम सुरु असलेल्या व बंद बंगल्यांचे फिटींगमधील वायर काढुन घेण्याबाबत घरफोडी व चोरीसारखे गुन्हे दाखल होते.
या गुन्ह्यांच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांच्या सूचनांप्रमाणे पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व तपासी अंमलदार पवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार शिंदे व लोखंडे यांनी या गुन्हयाबाबत माहिती मिळवून ओकार संतोष राजपुरे, विशाल सुरेश आडागळे, सागर निलेश वैराट, दीपक नथुराम गोळे, ऋषी वाडकर हे संशयित निष्पन्न केले.
घरफोडी व चोरी करताना वापलेली वाहने जप्त करुन २ लाख ४४ हजार ९०० रुपयांचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ननवरे, हवालदार पवार, शिंदे व लोखंडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.