पुणे – मध्य रेल्वेमध्ये प्रवाशांच्या तपासणीसाठी आता आत्मापाठोपाठ “कॅप्टन अर्जुन’देखील दाखल झाला आहे. याची निर्मिती पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने केली असून, शुक्रवारी “ऑनलाइन’ पद्धतीने हिरवा कंदिल दाखवण्यात आला.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1239765663029803/
प्रवाशांची तपासणी आणि स्थानक सुरक्षेसाठी “अर्जुन'(ऑलवेज बी रिस्पॉन्सिबल ऍन्ड जस्ट युज टू बी नाईस) ची नेमणूक करण्यात आली आहे. सेन्सर, “पीटीझेड'(पॅन, टिल्ट, झूम) कॅमेरा, डोम कॅमेरासह कॅप्टन अर्जुन सज्ज असून, यातील “आर्टिफिशियल इंटिलेजेन्स’मुळे स्थानकातील संशयास्पद हालचालींवर लक्ष राहणार आहे. अर्जुनकडे “थर्मल स्क्रिनिंग’ची यंत्रणा असून, यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील तापमान मोजता येणार आहे.