पुणे – शहरात लॉकडाऊन 5.0 मध्ये महापालिकेने कंटेन्मेंट झोनलाही (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र) काहीसा दिलासा दिला आहे. या भागात सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहतील. त्यात किराणा, दूध तसेच भाजी, औषध विक्री, रेशन दुकानांचा समावेश आहे.
करोना प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने 10 मेपासून कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन केले. त्यात काही भागात दवाखाने आणि मेडिकल सुरू होते. तर 17 मे रोजी काही नियम शिथिल करण्यात आले. पण, आता या भागालाही दिलासा देण्यात आला असून, येथील अत्यावश्यक सुविधा आता पाच तास सुरू असणार आहेत. तर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या वाहनांना या भागात असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांत सवलत असेल.
पुण्यात हे बंदच राहणार
– शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थांच्या शिकवण्या, ई.
– सिनेमा हॉल, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीची ठिकाणे, नाट्यगृहे, या अनुषंगिक ठिकाणे.
– सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि कोणत्याही कारणाने होणारी मोठी गर्दी.
– धार्मिक स्थळे. केशकर्तनालय,ब्युटी पार्लर, स्पा.
– मॉल, हॉटेल, उपाहारगृहे आणि अन्य आदरातिथ्य करणाऱ्या सेवा.
पुणेकरांनो, सार्वजनिक ठिकाणी घ्या ही काळजी
– मास्क वापरणे बंधनकारक
– नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
– कुठलीही संघटना, व्यवस्थापक सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊ देणार नाहीत.
– लग्न समारंभासारख्या कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 पाहुणे/व्यक्ती एकत्र येऊ शकतात.
– अंत्यसंस्कार किंवा तशा विधीस जास्तीत जास्त 20 व्यक्ती एकत्र येऊ शकतात.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास होणार दंड
– पान, तंबाखू, मद्य, इ. चे सार्वजनिक ठिकाणी सेवन करता येणार नाही.
– मद्यविक्रीच्या दुकानात 2 व्यक्तींमधील अंतर किमान 6 फूट इतके राहील. एकावेळी जास्तीत जास्त 5 व्यक्ती हजर राहू शकतील.